Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

आसियान-भारत अर्थमंत्र्यांची बैठक

  • Home
  • Current Affairs
  • आसियान-भारत अर्थमंत्र्यांची बैठक

इंडोनेशियात सेमारंग इथे 21 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या झालेल्या असियान-भारत अर्थमंत्र्यांच्या 20 व्या बैठकीत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांचे अतिरिक्त सचिव, राजेश अग्रवाल सहभागी झाले होते. इंडोनेशियाचे व्यापार मंत्री डॉ, जुल्खीफ्ली हसन यांच्यासोबत त्यांनी या बैठकीचे सहअध्यक्षपदही भूषवले. ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम अशा सर्व 10 आसियान देशांतील अर्थमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. तिमोर-लेस्टे (ईस्ट तिमोर) देशाचे प्रतिनिधी देखील सभेत निरीक्षक म्हणून सहभागी झाले.

उद्देश:

सर्व मंत्र्यांनी, भारत आणि असियान देशातील द्वीपक्षीय व्यापारी आणि गुंतवणूक विषयक संबंधांचा आढावा घेतला तसेच, भारत आणि आसियान देशांमधील आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली. ही भागीदारी अधिक सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी व्हावी ज्यातून काही अर्थपूर्ण लाभ दोन्ही बाजूंना मिळावे, विशेषतः महामारीनंतर सर्व देशांना परस्परांची मदत मिळावी यावर या बैठकीत भर देण्यात आला. भारत आणि आसियान यांच्यात 2022-23 मध्ये 5 अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार झाला आहे. 2022-23 मध्ये भारताच्या एकूण जागतिक व्यापारात असियान सोबतचा व्यापार 11.3% इतका होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *