भारताचे पहिले वैयक्तिक ऑलम्पिकपदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. नीरज चोप्राच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा दिवस भालाफेक दिवस (7 ऑगस्ट)म्हणून साजरा करतात त्याचप्रमाणे पहिले ऑलम्पिक वैयक्तिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली
खेळाडूंचा सन्मान:
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते माजी क्रिकेटपटू दिलीप वेंसरकर व बॅडमिंटन संघटक श्रीकांत वाड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदिल सुमारीवाला यांनाही जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे तर क्रीडापटू ,संघटना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले.
क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ:
आतापर्यंत जीवनगौरव पुरस्कारासाठी तीन लाख रुपये, तर क्रीडा पुरस्कारासाठी एक लाख रुपये दिले जात होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नवीन घोषणेनुसार आता जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये तर क्रीडा पुरस्कारसाठी तीन लाख इतकी रक्कम वाढविण्यात आली.


