Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘चांद्रयान- 3’ चंद्राच्या उंबरठ्यावर

  • Home
  • Current Affairs
  • ‘चांद्रयान- 3’ चंद्राच्या उंबरठ्यावर

भारतीय अवकाश संशोधन संस्थाच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा 17 ऑगस्ट रोजी पार पडला. मुख्य यानापासून लँडर मॉड्युल विलग करण्यात यश आले असून आता या लँडिंग मॉड्युलचा चंद्र पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. 23 ऑगस्ट रोजी ‘विक्रम’च्या अवतरणाची सर्वाधिक अवघड क्रिया पार पडणार आहे. ‘ विक्रम’ हा लँडर आणि त्यावर असलेला ‘प्रग्यान’ हा रोव्हर मुख्य यानापासून यशस्वीरित्या विलग झाल्याचे ‘इस्रो’ ने जाहीर केले. 23 ऑगस्ट रोजी या मोहिमेतील सर्वाधिक अवघड आणि शेवटचा टप्पा असेल. या दिवशी चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम चे अवतरण केले जाईल. याच टप्प्यावर चंद्रयान-2 ही मोहीम अयशस्वी झाली होती. ‘ प्रग्यान’ हे स्वयंचलित यान चंद्राच्या पृष्ठभागावर प्रवास करेल आणि तेथील माती दगड आधीचा अभ्यास करेल. या मोहिमेमुळे चंद्राबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळण्याची भारताबरोबरच जगभरातील संशोधकांना अपेक्षा आहे.

महत्त्वाचे टप्पे:-

14 जुलै :- चांद्रयान- 3 चे प्रक्षेपण

1 ऑगस्ट :  पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर

5 ऑगस्ट : चंद्राच्या कक्षेत प्रवेश

6, 9, 14 आणि 16 ऑगस्ट चंद्रभोवतीच्या कक्षांमध्ये घट

17 ऑगस्ट : विक्रम चे विलगीकरण

23 ऑगस्ट :  विक्रम चे अवतरण(प्रस्तावित)

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *