Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

एकनाथ आव्हाड व विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर | SAHITYA AKADEMI AWARD ANNOUNCED TO EKNATH AWAD AND VISAKHA VISHWANATH

  • Home
  • Current Affairs
  • एकनाथ आव्हाड व विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर | SAHITYA AKADEMI AWARD ANNOUNCED TO EKNATH AWAD AND VISAKHA VISHWANATH
  • साहित्य अकादमीने 2023 या वर्षासाठीचे युवा व बाल साहित्य पुरस्कार जाहीर केले असून यात महाराष्ट्रातील दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे .
  • यात एकनाथ आव्हाड यांना बाल साहित्यासाठी तर विशाखा विश्वनाथ यांना युवा साहित्य साठी साहित्य अकादमीने पुरस्कार जाहीर केला आहे.
  • अकादमीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेसाठी युवा साहित्यासाठी विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना’ या कवितासंग्रहाला तर बाल साहित्यासाठी एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.
  • मानपत्र आणि 50 हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .
  • बाल साहित्यामध्ये विविध भाषेतील एकूण 22 साहित्यिकांच्या पुस्तकांना आणि युवा साहित्यासाठी 20 लेखकांच्या पुस्तकांना पुरस्कार देण्यात आला आहे.

अन्य भाषांतील पुरस्कार विजेते:

युवा:

1) हिंदी भाषा : अतुल कुमार रॉय : पुस्तकाचे नाव – चांदपुर की चंदा

2) गुजराती भाषा : सागर शहा  : गेट-टुगेदर

3) कन्नड : मंजूनायक चलुरु : फू मतू इतर कथेगलू

4)कोंकणी: तन्वी कामत : बाम्बोलकार शाट्स

5) इंग्रजी : अनिरुद्ध कानशेट्टी : लॉर्ड्स ऑफ द डेक्कन

बाल:

1)हिंदी : सूर्यनाथसिंह : कौतुक ऐप

2)इंग्रजी : सुधा मूर्ती :  ग्रँडपेरेंट्स बैग ऑफ स्टोरीज

3) गुजराती : रक्षाबहेन  प्रहाद राव दवे :हुं म्याऊ तूं चुं चुं

4)कन्नड : विजयश्री हालादी : सुरक्की गेट

5) कोकणी : तुकाराम रामा शेठ : जाण

साहित्य अकादमी पुरस्कार:

हा भारतातील एक साहित्यिक सन्मान आहे, जो साहित्य अकादमी , भारताची नॅशनल अकादमी ऑफ लेटर्स, दरवर्षी भारतीय संविधानाच्या 8 व्या अनुसूचीच्या 22 पैकी कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या साहित्यिक गुणवत्तेच्या सर्वात उत्कृष्ट पुस्तकांच्या लेखकांना प्रदान करते.

सुरवात : 1954

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *