स्पेनच्या कार्लोस अल्कराझने 23 ग्रँड स्लॅम विजेत्या सर्बिच्या नोव्हाक जोकोविचची विम्बल्डन स्पर्धेतील मक्तेदारी संपुष्टात आणली.
अल्कराझने16 जुलै रोजी झालेल्या अंतिम लढतीत 1-6, 7-6, 6-1, 3-6, 6-4 असा विजय मिळवला .
20 वर्षीय अल्कराझचे हे कारकिर्दीतील पहिले विम्बल्डन आणि दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपट ठरले.
गेल्या वर्षी ( 2022)मध्ये अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद त्याने पटकावले होते.
जोकोविच 2017 नंतर विम्बल्डनमध्ये प्रथमच पराभूत झाला.
8 विम्बल्डन जेतेपदाच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी जोकोविचने गमावली.
टेनिसचे भविष्य मानले जाणाऱ्या अल्कराझने 2017 नंतर ऑल इंग्लंड क्लबच्या स्पर्धेत जोकोविचला नमावणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आणि कारकिर्दीत पहिल्यांदा विम्बल्डन विजेतेपद पटकावले तसेच सेंटर कोर्टवर जोकोविच 45 सामन्यानंतर पराभूत झाला.
विम्बल्डनचे सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणारा खेळाडू: रॉजर फेडरर (8) (स्वित्झर्लंड)
महिला एकेरीत वोन्ड्रोउसोवा विजेती:
चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोन्ड्रोउसोवाने इतिहास रचताना प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेची पहिली बिगर मानांकित विजेती होण्याचा मान मिळवला.
वोन्ड्रोउसोवाने महिला एकेरीच्या अंतिम लढतीत ट्युनेशीयाच्या ओन्स जाबेऊरचा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानी असलेल्या 24 वर्षीय वोन्ड्रोउसोवाने जाबेउरवर 6-4, 6-4 अशी मात केली.
ऑल इंग्लंड क्लबच्या या स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठणारी डावखुरी वोन्ड्रोउसोवा साठ वर्षातील पहिली महिला टेनिसपटू होती.
विम्बल्डनचे सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणारी खेळाडू :मार्टिना नवरातिलोवा- 9 वेळा(1975 पूर्वी, झेकोस्लोव्हाकिया , 1975 नंतर अमेरिका)
विम्बल्डन स्पर्धा
स्पर्धा – 2023 ची एकूण 136 वी स्पर्धा
सुरवात : 1877(सर्वात जुनी ग्रँडस्लॅम)
ग्रास कोर्ट वरती खेळवली जाते.



