43 जवानांचा समावेश असलेली भारतीय लष्कराची तुकडी 16 जुलै रोजी मंगोलियाला रवाना झाली.
हे दल द्विपक्षीय संयुक्त लष्करी कवायतींच्या “ नोमॅडिक एलिफंट-23” च्या 15 व्या सत्रात सहभागी होणार आहे.
या कवायती 17 ते 31 जुलै 2023 या कालावधीत मंगोलियातील उलानबाटार येथे आयोजित केल्या जात आहेत.
नोमॅडिक एलिफंट (NOMADIC LEPHANT) हा एक वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो मंगोलिया आणि भारतात आलटून पालटून आयोजित केला जातो.
या कवायतींचे यापूर्वीचे सत्र ऑक्टोबर 2019 मध्ये बाक्लोह येथील स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते.
मंगोलियन सशस्त्र सेना युनिट 084 चे सैनिक आणि जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे भारतीय सैन्याचे सैनिक या सरावात सहभागी होणार आहेत.
भारतीय लष्कराची तुकडी 16 जुलै 23 रोजी भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानाने उलानबाटर येथे पोहोचली.
सरावाचा उद्देश:-
सकारात्मक लष्करी संबंध निर्माण करणे, सर्वोत्कृष्ट पद्धतींची देवाणघेवाण करणे, आंतर-कार्यक्षमता, सौहार्द, सलोखा आणि दोन्ही सैन्यांमधील मैत्री विकसित करणे हा या सरावाचा उद्देश आहे.
सरावाची प्राथमिक संकल्पना संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार पर्वतीय भूभागात दहशतवादविरोधी कारवाया यावर लक्ष केंद्रित करेल.
या कवायतींमध्ये प्लाटून स्तरीय फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज (FTX) समाविष्ट आहे.
तसेच भारतीय आणि मंगोलियन सैन्य त्यांचे कौशल्य आणि क्षमता वाढविण्यासाठी त्यांना आखून दिलेल्या विविध प्रशिक्षण उपक्रमांमध्ये सहभागी होतील.
अशा उपक्रमांमध्ये धैर्य वाढवणे, रिफ्लेक्स फायरिंग, रूम इंटरव्हेंशन, लहान तुकडी रणनीती आणि रॉक क्राफ्ट प्रशिक्षण यांचा समावेश असतो.
दोन्ही देशांचे सैनिक परस्पर युद्ध कौशल्याचे अनुभव प्राप्त करतील.
भारत आणि मंगोलिया या देशांमध्ये प्रादेशिक सुरक्षा आणि सहकार्यासाठी सामायिक वचनबद्धता आहे.
नोमॅडिक एलिफंट-23 (NOMADIC ELEPHANT-23) हा सराव भारतीय लष्कर आणि मंगोलियन लष्कर यांच्यातील संरक्षण सहकार्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होऊ शकतील.


