Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महाराष्ट्रातील पहिले ‘पीएम- मित्र पार्क’ अमरावतीत उभारले जाणार | MAHARASHTRA’S FIRST ‘PM-MITRA PARK’ WILL BE SET UP IN AMRAVATI

  • Home
  • Current Affairs
  • महाराष्ट्रातील पहिले ‘पीएम- मित्र पार्क’ अमरावतीत उभारले जाणार | MAHARASHTRA’S FIRST ‘PM-MITRA PARK’ WILL BE SET UP IN AMRAVATI

महाराष्ट्रातील पहिले ‘पीएम -मित्र पार्क’ हे वस्त्रउद्योग उद्यान अमरावतीत उभारण्यात येणार असून त्याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

या वस्त्रोद्योग उद्यानाबाबत चार कंपन्यांनी राज्य सरकारशी 1,320 कोटींचे सामंजस्य करार केले.

पीएम मित्र पार्क’ केंद्राबाबत सामंजस्य करार करण्यात आल्यानंतर राज्यातील तरुणांना नोकऱ्या मिळतील, रोजगार निर्माण होणार आहे, राज्याची आर्थिक भरभराटही होईल .

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे 1020 एकर जागेवर ‘पीएम मित्र पार्क’ वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येणार आहे.

1,320 कोटींचे सामंजस्य करार:

‘पीएम मित्र पार्क’ हे वस्त्रोद्योग उद्यान विकसित करण्याबाबत चार उद्योगांशी 1,320 कोटींचे चार सामंजस्य करार करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे:-

1) सनाथन पॉलीकॉट – (1,000 कोटी)

2)पॉलिमन इंडिया-( 20 कोटी)

3) प्रताप इंडस्ट्रीज – (200 कोटी)

4) सिद्धिविनायक कॉटस्पिन – (100 कोटी)

केंद्र सरकारने पीएम मित्र पार्क ची घोषणा 15 जानेवारी 2022 रोजी केली होती .

ही केंद्रे उभारण्यासाठी अनेक राज्याने आपले प्रस्ताव सादर केले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *