मराठी चित्रपटातील देखना नायक अशी ओळख असलेले प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले.
अल्पचरित्र:-
देखणेपण आणि दमदार अभिनयाच्या बळावर अभिनेते रवींद्र महाजनी यांनी 1975 ते 1990 पर्यंतचा कालखंड गाजवला .
बेळगाव येथे जन्म झालेले रवींद्र महाजनी हे जेष्ठ पत्रकार ह.रा .महाजन यांचे पुत्र होते.
जाणता -अजाणता या नाटकातून रवींद्र महाजनी यांना काम करण्याची पहिली संधी मधुसूदन कालेलकर यांनी दिली होती.
‘मुंबईचा फौजदार’, ‘झुंज’, ‘देवता’ आणि ‘गोंधळात गोंधळ’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अजूनही रसिकांच्या स्मरणात आहेत.
मराठीतील या रुबाबदार अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात टॅक्सी चालक म्हणून केली होती.
जवळपास तीन वर्षे त्यांनी मुंबईत टॅक्स चालवली.
व्ही .शांताराम यांच्या ‘झुंज’ चित्रपटातून रवींद्र महाजन यांचे कलाविश्वात पदार्पण झाले.
त्यांनी मराठीसह हिंदी, गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे.
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. हा त्यांचा अखेरच्या चित्रपट ठरला.
रवींद्र महाजनी यांचे गाजलेले काही चित्रपट:
‘ झुंज’,’ मुंबईचा ‘,’फौजदार’,’ देवता’, ‘आराम हराम आहे’, ‘देवघर’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘हळदीकुंकू’, ‘थोरली जाऊ’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावले’,’ चांदणे शिंपीत जा’,’ गल्ली ते दिल्ली’, ‘कळत नकळत’,’ सर्जा’ ‘माहेरची माणसे’, ‘अष्टविनायक’, ‘चोरावर मोर’, ‘जीवा सखा’, ‘सावली प्रेमाची’,’ हेच माझं माहेर’,’ गुंज’,’ देऊळ बंद’,’ पानिपत’,’ बेलभंडार'( नाटक), ‘अपराध मीच केला’ (नाटक)



