वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू अगर जखमी झाल्यावर भरपाईसाठी केलेला अर्ज 30 दिवसांत निघाली काढणे बंधनकारक आहे. यानंतर विलंब झाल्यास भरपाई रकमेवर विहित दराने व्याज देण्याची तरतूद करणारे सुधारित वन्यप्राणी हल्ला, इजा किंवा नुकसान भरपाई विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले.
व्यक्ति मृत होणे, व्यक्ती कायम अपंग होणे, व्यक्ति किरकोळ जखमी झाल्यास भरपाईची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पशुधन मृत्यू पावणे, जखमी होणे, पिके, फळझाडे यांसह मालमत्ता यांच्या नुकसानी बद्दल नुकसान भरपाई मागता येईल शिवाय खोटा दावा केल्यास एक हजार रुपये इतक्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.


