नाविन्यपूर्ण योजनेतून हिंगणघाट नगर परिषदेने ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती केली आहे.
राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असून केवळ दहा लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या टॉयलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे.
अधिक माहिती
● दुहेरी उद्देशाने आणि अतिशय सुंदरपणे बांधलेल्या या टॉयलेटचे सर्वत्र कौतुक होत आहे.
● स्वच्छ आणि सुंदर शहर या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्रात प्रथमच स्वच्छ सुंदर आणि आकर्षक अशा स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती नगरपरिषद्वारे करण्यात आली.
● वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नाविन्यपूर्ण योजनेतून दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.
● हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील निसर्गरम्य परिसरात दोनशे स्क्वेअर फुट इतकी कमी जागेत हे टॉयलेट उभारण्यात आले आहे.
● यामध्ये एक कॅफे, पुरुष व महिलांकरिता प्रत्येकी दोन पाश्चात्य पद्धतीचे शौचालय, वॉश बेसिन, तसेच महिलांकरिता सॅनिटरी वेंडिंग मशीन इत्यादी प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


