देशाचे डिजिटल चलन असलेल्या सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात ई- रुपीने एका दिवसात दहा लाखाहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम नोंदविला आहे. 27 डिसेंबर 2023 रोजी ई- रुपीने हा विक्रम केल्याचे भारतीय रिझर्व बँकेने जाहीर केले. भारताने दाखल केलेली यूपीआय प्रणाली आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त सुविधा ठरली आहे, तर ई- रुपीने ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवत विक्रमी कामगिरी केली आहे.
अधिक माहिती
● रिझर्व बँकेने 1 डिसेंबर 2022 रोजी ई- रुपी हे देशाचे पहिले डिजिटल चलन दाखल केले.
● रिझर्व बँकेने 2023 च्या अखेरीस दहा लाख डिजिटल चलन व्यवहारांचा विक्रम गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले.
● ई-रुपी व्यवहारासाठी बँक खात्याची आवश्यकता नसते.
● रिझर्व बँक प्रत्यक्ष चलन ऐवजी ई-रुपी थेट डिजिटल वॅलेट मध्ये हस्तांतरण करते .
● हे डिजिटल वॅलेट बँकेकडून जारी केले जाते.
● फोन पे, पेटीएम, google पे, सारख्या इतर पेमेंट सिस्टीम मध्ये व्यवहार किमान एका बँकेतून केला जातो.
● ई-रुपी किंवा कोड स्कॅन करून थेट हस्तांतर करता येतात.
● यूपीआय द्वारे व्यवहार करण्यासाठी बँक खात्यात पैसे असणे आवश्यक आहे यासाठी तुम्हाला एक तर स्वतः खात्यात रोख पैसे जमा करावे लागतात किंवा इतर बँक खात्यातून खात्यात भरावे लागतात .
● ई-रुपीमध्ये प्रत्यक्ष चलन एकदाही खात्यात जमा करावे लागत नाही.
ई- रुपी म्हणजे काय ?
● सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) याला ई-रुपी म्हणतात.
● हे कागदी चलनाचे डिजिटल स्वरूप आहे जे क्रिप्टो चलनासारख्या ब्लॉक-चेन तंत्रज्ञानावर आधारित आहे.
● त्याचे मूल्य सध्याच्या चलनाच्या बरोबरीचे आहे.
● 100, 200 रुपयांच्या नोटा प्रमाणे ही सरकारची कायदेशीर निविदा आहे, जी स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही.
● ई-रुपी फक्त मोबाईल वॉलेटमध्ये ठेवता येतात. ते ठेवण्यासाठी बँक खात्याची गरज नाही.
● सीबीडीसी घाऊक आणि रिटेल अशा दोन प्रकारात वापरण्यास उपलब्ध आहेत.


