‘आरईसी’ कंपनीने पुढील तीन वर्षांमध्ये देशातील ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि वाहतूक प्रकल्पांच्या अर्थसाहाय्यासाठी बँक ऑफ बडोदा सोबत सामंजस्य करार केला आहे. ‘आरईसी’ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक कुमार दिवांगन आणि ‘बँक ऑफ बडोदा’ चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त चंद यांच्यासह बँक ऑफ बडोदा चे कार्यकारी संचालक ललित त्यागी यांच्या उपस्थितीत नुकतीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या दोन्ही संस्था आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांसाठी संयुक्तरित्या प्रयत्न करीत आहेत.


