1988 च्या तुकडीतील ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
अधिक माहिती
● या पदावर काम करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
● रजनी शेठ 31 डिसेंबर 2023 रोजी महासंचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी काही दिवस विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
● आता मात्र राज्याला पूर्ण वेळ नवीन पोलीस महासंचालक मिळाले असून रश्मी शुक्ला यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.
● शुक्ला ह्या 30 जून 2024 रोजी निवृत्त होणार आहेत.
● शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाचे महासंचालक पद पुणे पोलीस आयुक्त अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.


