आपल्या गायनाने केवळ भारतच नव्हे तर विविध देशांतील संगीत प्रेमींवर गारुड करणारे प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय गायक उस्ताद राशीत खान यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले. उस्ताद राशीद खान रामपूर सहस्वान घराण्याचे गायक होते. गेली चार वर्षे ते प्रोटेस्ट ग्रंथींच्या कर्करोगाशी झुंजत होते. उस्ताद राशीद खान यांच्यावर उस्ताद आमिर खान आणि भीमसेन जोशी यांच्या गायकीचा प्रभाव होता. दोन्ही गायकांचा प्रभाव त्यांच्या गायन शैलीत जाणवत असे.
अल्प परिचय
● राशीद खान यांचा जन्म 1968 यावर्षी उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात झाला.
● त्यांची मामे आजोबा उस्ताद निसार हुसेन खान यांच्याकडून त्यांना संगीताचे प्राथमिक धडे मिळाले.
● गायकीमध्ये ग्वाल्हेर घराण्याशी जवळीक साधणारे घराणे म्हणून त्यांचे घराणे प्रसिद्ध होते.
● राशिद खान यांनी 1978 यावर्षी वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात गायन केले.
● 1980 मध्ये उस्ताद निसार हुसेन खान कोलकत्याला स्थायिक झाले त्यांच्याबरोबर राशीद देखील कोलकत्याला आले.
● वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी अकॅडमीमध्ये औपचारिक संगीत शिक्षणाला सुरुवात केली.
● 1994 पर्यंत त्यांना अकादमीमध्ये संगीतकार म्हणून मान्यता मिळाली होती.
● माय नेम इज खान, जब वी मेट ,इसाक, मंटो, मौसम, बापी बारी जा,चक्रव्यूह, मी वसंतराव, दशहरा, कादंबरी आणि मितीन मासी या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.
● जब वी मेट या चित्रपटातील ‘आयोगे जब तुम’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय आहे.
राशीद खान यांची निवडक अल्बम
● क्लासिकल वंडर्स ऑफ इंडिया, कृष्ण- उस्ताद राशीद खान, राशीद अगेन, निर्गुण, कबीर, शाबाद किर्तन गुरबानी, हे भगवान, मास्टर पीसेस उस्ताद राशीद खान, रिफ्लेक्शन्स, द सॉंग ऑफ शिव, मॉर्निंग मंत्र, सिलेक्शन- मेघ हंसवर्धनी, व्हाईस ऑफ इंडिया, इन लंडन, अ जीनियस ऑफ राशीद खान, साजन मोरे घर आजाओ, ख्याल, श्याम कल्याण, राग यमन, राग बागेश्री
पुरस्कार
● 2006 – पद्मश्री
● 2006 – संगीत नाटक अकादमी पुरस्कार
● 2010 – जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार
● 2012 – महासंगित सन्मान पुरस्कार
● 2012 – पश्चिम बंगालचा सर्वोच्च बंगभूषण पुरस्कार
● 2013 – मिर्ची संगीत पुरस्कार
● 2022 – पद्मभूषण