जगभरात तसेच भारतात 10 जानेवारी हा दिवस विश्व हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. हिंदी भाषेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी या दिनाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे.
अधिक माहिती
● अनेक शाळा महाविद्यालय तसेच विद्यापीठांत हिंदी भाषेचे वाचन केले जाते तसेच हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले जाते.
● 10 जानेवारी 1975 मध्ये पहिल्यांदा विश्व हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर विश्व हिंदी दिवस देखील साजरा करण्यात यावा म्हणून 10 जानेवारी हा दिवस 2006 या वर्षापासून ‘विश्व हिंदी दिन’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.
● ‘राष्ट्रीय हिंदी दिन’ 14 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.