केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) चमूला ‘उल्लेखनीय कामगिरी’ साठीचा या वर्षाचा “इंडियन ऑफ द इयर पुरस्कार” प्रदान केला. एका राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीतर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि चांद्रयान 3 चे प्रकल्प संचालक डॉ. पी. वीरमुथुवेल यांनी स्वीकारला.
अधिक माहिती
● ‘इस्रो’ ने अंतराळ संशोधनाच्या कक्षा विस्तारण्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव पुरस्कार प्रशस्तिपत्रकात करण्यात आला.
● “2023 हे वर्ष निःसंशयपणे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नोंदवले जाईल, ज्या काळात भारताच्या अंतराळ संस्थेने आव्हानांचा सामना करताना अतुलनीय कुशलता आणि लवचिकता दाखवली.
● 2023 मध्ये इस्रोच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणजे चंद्राच्या अज्ञात दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर चांद्रयान-3 चे पहिले यशस्वी सॉफ्ट लँडिंग होते.