उत्तर कोरियातील लष्करी ठिकाणावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीवेळी जलद प्रतिसाद देण्यासाठी जपानने सरकारी हेरगिरी उपग्रह प्रेक्षेपित केला.
अधिक माहिती
● मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजने बनवलेल्या ‘एच 2 ए’ हे प्रक्षेपकावरून ‘ऑप्टिकल-8’ उपग्रहाचे नैऋत्य जपानमधील तानेगाशिमा स्पेस सेंटर मधून प्रक्षेपण करण्यात आले.
● जपानच्या लष्करी क्षमतेला वेगाने चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग याकडे पाहिले जात आहे.
● खराब हवामानातही उपग्रह स्पष्ट छायाचित्रे काढू शकतो.
● उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राने 1998 मध्ये जपानच्या हद्दीत उड्डाण केल्यानंतर जपान गुप्तचर – संकलन उपग्रह कार्यक्रम सुरू केला होता.