माजी सैनिकांच्या निःस्वार्थ कर्तव्य आणि बलिदानाच्या सन्मानार्थ आणि या शूरवीरांच्या पुढच्या पिढीच्या नातेवाईकांसमवेत अधिक दृढतेसाठी 14 जानेवारी 2024 रोजी 8 वा सशस्त्र दल माजी सैनिक दिन देशभरात अनेक ठिकाणी साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधून श्रीनगर, पठाणकोट, दिल्ली, कानपूर, अलवर, जोधपूर, गुवाहाटी, मुंबई, सिकंदराबाद, कोची आणि इतर अनेक ठिकाणी पुष्पांजली अर्पण समारंभ आणि माजी सैनिकांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
अधिक माहिती
● संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दल स्टेशन, कानपूर येथे माजी सैनिकांच्या रॅलीला संबोधित करून या मेळाव्याचे नेतृत्व केले.
● या मेळाव्याला सुमारे एक हजार माजी सैनिक उपस्थित होते.
● संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि मातृभूमीसाठी केलेल्या नि:स्वार्थ सेवेबद्दल वीरांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
● प्रत्येक भारतीयाच्या हृदयात माजी सैनिकांचे विशेष स्थान आहे यावर त्यांनी भर दिला.
● 1953 मध्ये या दिवशी सेवानिवृत्त झालेल्या सशस्त्र दलाचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांनी केलेल्या सेवेच्या सन्मानार्थ दरवर्षी 14 जानेवारी रोजी सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा केला जातो.
● हा दिवस पहिल्यांदा 2016 मध्ये साजरा करण्यात आला होता.
● माजी सैनिकांच्या सन्मानार्थ अशा संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.