भारताचा 18 वर्षीय युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद याने ऐतिहासिक कामगिरी केली.
त्याने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत विश्वविजेत्या चीनच्या डिंग लिरेन याला पराभवाचा धक्का दिला.
अधिक माहिती
● या विजयामुळे त्याला फिडेच्या रेटिंगमध्ये दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद याला मागे टाकता आले आहे.
● आता आर. प्रज्ञानंद भारताचा पहिल्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू ठरला आहे.
● या विजयामुळे आर. प्रज्ञानंद 2.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तसेच प्रज्ञानंद याचे रेटिंग 2748.3 इतके झाले आहेत.
● पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या विश्वनाथन आनंदचे रेटिंग 2,748 इतके आहे.
● प्रज्ञानंद .3 रेटिंगने आनंदच्या पुढे आहे.
● आर. प्रज्ञानंदला गेल्या काही काळात दमदार खेळ करता आला आहे. विश्वकरंडकाचे उपविजेपद त्याने राखले होते.