युवकांच्या म्हणजेच 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेस आजपासून दक्षिण आफ्रिकेत सुरुवात होत आहे. ही एकूण 15 वी स्पर्धा असून या स्पर्धेवर भारताचे वर्चस्व राहिलेले आहे. सर्वाधिक पाच वेळा हा विश्वकरंडक भारताने उंचावलेला आहे.
अधिक माहिती
● भारत गतविजेते असून, इंग्लंडला हरवून विजेतेपद मिळवले होते.
● स्पर्धेचा कालवधी : 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी
● पोचेस्टुम, ब्लोएमफौंटन, बेनोनी, किम्बली आणि ईस्ट लंडन या ठिकाणी सामने आयोजित करण्यात आले आहेत.
● श्रीलंका या स्पर्धेचे मूळ यजमान होते, परंतु आयसीसीने त्यांच्या संघटनेवर बंदी घातल्यामुळे स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होत आहे.
● द. आफ्रिकेत ही स्पर्धा याआधी 1998 आणि 2020 मध्ये झाली होती.
● 16 संघांची चार गटांत विभागणी.
● गटातील पहिले तीन संघ सुपर सिक्ससाठी पात्र.
● सुपर सिक्समध्ये 12 संघांची दोन गटांत विभागणी आणि या दोन गटांतील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र
आतापर्यंतचे विजेते
• भारत (5 वेळा) : 2000, 2008, 2012, 2018, 2022
• ऑस्ट्रेलिया (3 वेळा) : 1988, 2002, 2010
• पाकिस्तान (2 वेळा) : 2004, 2006
• बांग्लादेश (1 वेळा) : 2020
• दक्षिण आफ्रिका (1 वेळा) : 2014
• वेस्ट इंडिज (1 वेळा) : 2016
• इंग्लंड (1 वेळा) : 1998