मराठवाडा साहित्य परिषदेच्या 2024 यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यकरार बोराडे यांना जाहीर झाला. रोख पंचवीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अधिक माहिती
● अहमदपूर येथे झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
● कादंबरी, कथासंग्रह, एकांकिका, नाटक, बालसाहित्य लेखनातून बोराडे यांनी महत्त्वाचे लेखन केले आहे.
● ‘पाचोळा’ ही कादंबरी मराठी साहित्यात मैला दगड ठरली आहे.