हॉंगकॉंग येथे झालेल्या आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत मानसिंगने सुवर्णपदक जिंकले. ही स्पर्धा जिंकलेला तो दुसरा भारतीय ठरला. गतवर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये अकरावा आलेल्या मानसिंगने आपली कामगिरी उंचावून बाजी मारली.
अधिक माहिती
● 34 वर्षीय मानसिंगची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी दोन तास 16.58 मिनिटे होती. त्याने त्यात सुधारणा करताना आशियाई स्पर्धेत दोन तास 14.19 मिनिटे वेळ दिली.
● त्याने चीनच्या हुआंग याँगझेंग (2 तास 15.24मिनिटे) याला मागे टाकले.
● किर्गिजस्तानचा तिआप्किन इल्या तिसरा आला.
● भारताच्या एपी बेलिअप्पा याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
● ही स्पर्धा जिंकलेला मानसिंग हा दुसरा भारतीय आहे. टी. गोपीने 2017 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
● त्या वेळी त्याने चीनमधील शर्यतीत दोन तास यांनी 15.48 मिनिटे ही वेळ दिली होती.
● महिलांच्या स्पर्धेत भारताची अश्विनी जाधव आठवी आली.