भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू व टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बीसीसीआयकडून देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये ठसा उमटवणाऱ्या शुभमन गिल याची वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू निवड करण्यात आली.
अधिक माहिती
● 61 वर्षीय रवी शास्त्री यांनी भारतासाठी 80 कसोटी सामने खेळले असून 150 एकदिवसीय सामन्यांत त्यांनी टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले आहे.तसेच त्यांनी दोन वेळा भारतीय क्रिकेट संघाला प्रशिक्षणही केले आहे.
● रवी शास्त्री यांनी सुरुवातीला 2014 ते 2016 दरम्यान मुख्य प्रशिक्षकपदी काम केले.
● त्यानंतर विराट कोहलीच्या साथीने 2021 मधील टी-20 विश्वकरंडकापर्यंत त्यांनी भारतीय संघाला मार्गदर्शन केले.
● रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनात टीम इंडियाने सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.


