फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 11 व्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 104.4 अब्ज डॉलर आहे. मुकेश गौतम अदानी 16 व्या स्थानावर असून त्यांची संपत्ती 75.7 अब्ज डॉलर आहे.
अधिक माहिती
● जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिले स्थान जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट यांनी मिळविले आहे. त्यांनी ‘टेस्ला’चे सीईओ एलॉन मस्क यांना मागे टाकून पहिले स्थान मिळविले आहे.
● त्यामुळे मस्क आता या यादीत दुसऱ्या स्थानावर आले आहेत, तर जेफ बेझोस तिसऱ्या स्थानावर आहेत.
पहिले दहा श्रीमंत (संपत्ती अब्ज डॉलरमध्ये)
● बर्नार्ड अरनॉल्ट – 207.6
● एलॉन मस्क – 204.7
● जेफ बेझोस – 181.3
● लॅरी एलिसन – 142.2
● मार्क झुकरबर्ग – 139.1
● वॉरेन बफेट – 127.2
● लॅरी पेज – 127.1
● बिल गेट्स – 122.9
● सर्जी ब्रेन – 121.7
● स्टीव्ह बाल्मर – 118.8