नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतातील हिम बिबट्याच्या स्थितीबाबत अहवाल प्रकाशित केला.
भारतातील हिम बिबट्या संख्येचे मूल्यांकन (एसपीएआय ) कार्यक्रम हा हिम बिबटयांसंदर्भातील भारतातील पहिला वैज्ञानिक अभ्यास असून ज्यामध्ये भारतात 718 हिम बिबट्याची संख्या नोंदवण्यात आली.
अधिक माहिती
● भारतीय वन्यजीव संस्था (डब्लू आय आय ) या अभ्यासासाठी राष्ट्रीय समन्वयक असून हा अभ्यास सर्व हिम बिबट्या श्रेणीतील राज्ये आणि नेचर कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन, म्हैसूर आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ -इंडिया या दोन संवर्धन भागीदारांच्या सहकार्याने करण्यात आला आहे.
● एसपीएआय ने पद्धतशीरपणे देशातील संभाव्य हिम बिबट्याच्या 70% पेक्षा जास्त क्षेत्राचा अभ्यास केला असून यामध्ये वन आणि वन्यजीव कर्मचारी, संशोधक, स्वयंसेवक आणि माहिती भागीदारांचे योगदान आहे.
● लडाख आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशांसह आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांसह, ट्रान्स-हिमालयीन प्रदेशात अंदाजे 120,000 किमी वर्ग क्सेचत्रातील महत्त्वाच्या हिम बिबट्याच्या अधिवासामध्ये हा अभ्यास 2019 ते 2023 या कालावधीत एक सूक्ष्म दोन टप्प्यांमधील आराखडा वापरून करण्यात आला.
● 2019 मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राबवलेल्या पहिल्या टप्प्यात हिम बिबट्याच्या स्थानिक वर्गीकरणाचे मूल्यमापन करणे, विश्लेषणात अधिवास हा स्वतंत्र घटक समाविष्ट करणे, भारतातील हिम बिबट्याच्या राष्ट्रीय संख्येच्या मूल्यांकनाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी संरेखित करणे या पैलूंचा समावेश होता.
● या पद्धतशीर अभ्यासामध्ये संभाव्य वर्गीकरण श्रेणीमध्ये वास्तव्य -आधारित नमुना पद्धतीद्वारे अवकाशीय वर्गीकरणाचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे.
● दुसऱ्या टप्प्यात, निश्चित केलेल्या प्रत्येक स्तरीकृत प्रदेशात कॅमेरा सापळे वापरून हिम बिबट्याच्या संख्येचा अंदाज लावला गेला.