राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि या दिवसाचा मुख्य उद्देश प्रदूषण रोखण्याबद्दल जागरूकता वाढवणं हा आहे.
थीम :- “स्वच्छ आणि निरोगी ग्रहासाठी शाश्वत विकास”
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस’ म्हणजे काय?
• ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस’ किंवा राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिवस भारतात दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
• या दिवशी प्रदूषण नियंत्रण उपाय आणि आपत्ती टाळण्यासाठी जनजागृती केली जाते.
• 1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावलं त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसा’चा इतिहास काय आहे?
• ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस’ जाणून घेण्यासोबतच राष्ट्रीय प्रदूषण दिनाचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे.
• भोपाळमधील गॅस दुर्घटना ही भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण आपत्ती मानली जाते.
• 1984 मध्ये 2 आणि 3 डिसेंबरच्या रात्री मध्य प्रदेशातील युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेडमध्ये मिथाइल आयसोसायनेटची गळती झाली.
• या गळतीमुळे 3 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. लाखो लोक प्राणघातक वायूच्या संपर्कात आले. तेव्हापासून हा दिवस औद्योगिक आपत्ती टाळण्यासाठी आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.
• भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
• या वर्षाचा 39 वा ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस’ आहे.
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचे महत्व
• या दिनाचे महत्व सांगायचे झाल्यास विषारी हवेमुळे किंवा वातावरणातील प्रदूषणामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागू नयेत आणि प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी, पर्यावरणाची मदत घेणे आणि पर्यावरणाचा समतोल साधणे हे फार महत्वाचे आहे.
• हे प्रदूषण रोखण्यासाठी आणि या प्रदूषणापासून सुटका करणाऱ्या उपायांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस खास करून साजरा केला जातो.


