राज्यातील नागरी सहकारी बँकांना येत असलेल्या अडचणींचा अभ्यास करून त्यांना सरकारकडून कोणती मदत करता येईल, याबाबत अहवाल देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सायली भोईर या सदस्य सचिव असतील.


