काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्ताने रेवंत रेड्डी सरकारने महिलांसाठी मोफत बस सेवा योजना सुरू केली. तसेच आरोग्यश्री आरोग्य विमा कवचची मर्यादा दहा लाखांपर्यंत वाढविली. मोफत बस योजना (महालक्ष्मी) नुसार महिलांना आता प्रदेशात राज्य परिवहन महामंडळाच्या एक्स्प्रेस आणि साध्या बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय दहा लाखांपर्यंतच्या मोफत उपचाराशी संबंधित आरोग्य श्री योजनेचे देखील अनावरण करण्यात आले.