भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक संहिता आणि भारतीय साक्ष कायदा या तीन फौजदारी विधेयकावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली. हिवाळी अधिवेशनात सरकारने मांडलेल्या सुधारित विधेयकांना संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली होती. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकांना कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले असून त्यामुळे ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे इतिहास जमा झाले आहेत.