Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मर्केप्टोप्यूरिनचा पहिला मौखिक डोस विकसित

मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि नवी मुंबईतील, कर्करोग संशोधन आणि शिक्षण प्रशिक्षणाचे अत्याधुनिक केंद्र, (ACTREC) यांनी बंगळुरूच्या आयडीआरएस लॅब्स सोबत, सहकार्य करत, देशात, मर्कॅप्टोप्यूरिनचा पहिला आणि एकमेव मौखिक डोस, 6 – मर्कॅप्टोप्यूरिन (6-एमपी) विकसित केले आहे. 6-एमपी हे रक्तपेशींच्या गंभीर स्वरूपाच्या कर्करोगात, जो साधारणपणे लहान मुलांमध्ये आढळतो, त्यात किमोथेरपीचे औषध म्हणून वापरले जाते. त्यामुळे, लहान मुलांना सहजपणे घेता येईल, असं हे भुकटीस्वरूपातील मौखिक औषध, प्रीव्हल (PREVALL) या नावाने बाजारात आले आहे.

अधिक माहिती
• प्रीव्हल, सहजपणे 10 मिलि ग्राम/मिलि लीटरचा डोजपासून 100 मिलीचे मौखिक औषध तयार केले जाऊ शकते.
• प्रीव्हल सोबत एक सिरिंज आणि एक प्रेस इन बॉटल अडॅप्टर (पी. आय. बी. ए.) असते, यामुळे रुग्णाच्या शरीराच्या वजनाच्या किंवा शरीराच्या आकारमानानुसार अचूक डोस देणे शक्य होते. यामुळे सायटोटॉक्सिक संयुगांच्या संपर्कात येण्याचा धोका देखील यामुळे कमी होऊ शकतो.
• प्रीव्हल विकसित होण्यामुळे, संशोधकांनी, कर्करोग उपचार प्रवासातला एक मैलाचा दगड गाठला आहे. कारण सध्या या औषधाच्या गोळ्या उपलब्ध आहेत, मात्र, त्यामुळे, अचूक मात्रा, लवचिकता, रुग्णाची सहन करण्याची क्षमता, अशी सगळी आव्हाने असतात.
• आतापर्यंत, मुलांमधील मात्रेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोळी कुटून त्याची भुकटी देणे किंवा एक दिवसाआड डोस देणे अशा पद्धती अवलंबल्या जात होत्या.
• नियामक मान्यता : प्रीव्हलला भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून मान्यता मिळाली आहे.
• या नियामक मंजुरीत, प्रीव्हलची सुरक्षितता आणि अनुपालनावर भर देण्यात आला असून, त्यामुळे आरोग्यसेवा देणारे व्यावसायिक आणि रुग्ण दोघांनाही त्याची परिणामकारकता आणि गुणवत्तेबद्दल खात्री बाळगता येईल.
• टाटा मेमोरियल सेंटर आणि आय. डी. आर. एस. लॅब्सने संयुक्तपणे क्लिनिकल अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित केले.
• अलीकडेच पीडियाट्रिक ब्लड अँड कॅन्सर या वैज्ञानिक नियतकालिकात या निष्कर्षांना नियामक मान्यता मिळाली आहे.
• बाजारातील उपलब्धता : 6-मरकॅप्टोप्युरिनचे ड्राय पावडरच्या स्वरूपात उपलब्ध असलेले फार्मास्युटिकल सस्पेंशन हे आयडीआरएस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडचे पेटंट नोंदवलेले तंत्रज्ञान आहे.
• आयडीआरएस लॅब्सने 25 नोव्हेंबर 2023 रोजी चेन्नई येथे PHOCON परिषदेत PREVALL या कर्करोगावरील औषधाचे अधिकृत अनावरण केले.
• हे औषध डिसेंबर 2023 च्या सुरुवातीला मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आणि लवकरच ते देशभरातील सर्व प्रमुख रुग्णालयाच्या औषधालयात उपलब्ध असेल.
• ॲक्युट लिंफोब्लास्टीक ल्युकेमिया (ALL) या कर्करोगाच्या प्रकाराचे निदान झालेल्या 1-10 वयोगटातील अंदाजे 10,000 मुलांना दरवर्षी PREVALL चा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *