भारत सरकारने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) 1967 च्या कलम 3 (1) अंतर्गत ‘तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू आणि काश्मीर (TeH)’ ला ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित केले आहे.“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्धच्या शून्य-सहिष्णुतेच्या धोरणांतर्गत, भारतविरोधी कारवायांमध्ये सामील असलेली कोणतीही व्यक्ती किंवा संघटनेविरोधात ताबडतोब कारवाई करण्यात येणार आहे.
उदिष्ट
● जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करणे आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राजवट स्थापन करणे हे तेहरीक-ए-हुरियत, जम्मू आणि काश्मीर (TeH) चे उद्दिष्ट आहे.
अधिक माहिती
● ही संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्यासाठी दहशतवाद आणि भारतविरोधी प्रचारात सहभागी आहे.
● या संघटनेची अशी कृत्ये भारताच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेला घातक आहेत.
● या संघटनेविरुद्ध बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, शस्त्रास्त्र कायदा, आरपीसी आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.