राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेने (नाडा) नवी दिल्ली येथे ‘रोड टू पॅरिस 2024: चॅम्पियनिंग क्लीन स्पोर्ट्स अँड युनिटिंग फॉर अँटी-डोपिंग’ परिषदेचे आयोजन केले. गुजरातमधील गांधीनगर येथील प्रतिष्ठित राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात (एन. एफ. एस. यू.) पोषण पूरक चाचणीसाठी उत्कृष्टता केंद्राचे (सी. ओ. ई.-एन. एस. टी. एस.) अनुराग सिंह ठाकूर यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले.
अधिक माहिती
● नवी दिल्लीतील भारतीय आंतरराष्ट्रीय केन्द्र येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
● क्रीडा समुदायातील हितधारकांसाठी पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या आधी प्रमुख उत्तेजक विरोधी उपक्रमांवर एकत्र येण्यासाठी, विचारपूर्वक रणनीती आखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून हा कार्यक्रम मोलाची भूमिका बजावतो.
● नाडाने “द पॅरिस पिनाकलः नाडाज् गाईड टू एथिकल स्पोर्टिंग” चे अनावरण केले.
● पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची तयारी करणाऱ्या खेळाडूंसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करणारे एक महत्वाचे संसाधन आहे.
● हे मार्गदर्शक साहित्य, खेळाडूंसाठी दिशादर्शक म्हणून काम करते, त्यांना नैतिकदृष्ट्या स्पर्धा खेळण्यास आणि निष्पक्ष खेळाच्या तत्त्वांचे पालन करण्यास सक्षम करते.
● 2024 च्या ऑलिम्पिकसाठी जागतिक क्रीडा समुदाय पॅरिसमध्ये एकत्र येत असताना, ‘रोड टू पॅरिस 2024’ ही परिषद निकोप खेळांचे विजेतेपद मिळवण्याच्या आणि उत्तेजक पदार्थांविरूद्ध एकत्र येण्याच्या भारताच्या संकल्पाचा पुरावा म्हणून काम करते.
● सहयोगात्मक प्रयत्न आणि सामूहिक वचनबद्धतेसह, खेळातील निष्पक्षता, सचोटी आणि नैतिक स्पर्धेचा पथप्रदर्शक म्हणून आपली भूमिका भारत अधोरेखित करतो.