संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 12 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत डेहराडून मधील टोन्स ब्रिज स्कूल येथे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस), दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. देशाचे पहिले सीडीएस म्हणून जनरल रावत यांची नियुक्ती करण्यात आली, जी देशाच्या लष्करी इतिहासातील सर्वात महत्वाच्या सुधारणांपैकी एक आहे.
अधिक माहिती
● ‘सैनिकांचा सन्मान राखणे आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे’ हे सरकारचे कर्तव्य असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले.
● “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आपण सन्मान करत आहोत,” त्यांनी अधोरेखित केले.
● सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज करण्याबरोबरच, सरकारने शूरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले आहे, यावर त्यांनी भर दिला.
● जनरल रावत यांच्या पुतळ्याची स्थापना शाळेच्या आवारात करण्याच्या कल्पनेची प्रशंसा करून, संरक्षण मंत्री म्हणाले की, सशस्त्र दलाच्या शौर्य गाथा मुलांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्यामध्ये देशभक्ती आणि समर्पणाची भावना जागृत करणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे.