युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ही सेवा आता श्रीलंका आणि मॉरिशस या देशांतूनही सुरू झाली आहे. या दोन्ही देशांमध्ये 11 फेब्रुवारी रोजी सेवा प्रत्यक्ष सुरू झाली. दोन्ही देशांशी असलेले ऐतिहासिक संबंध आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाने आणखी दृढ झाल्याची भावना भारताचे पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.
अधिक माहिती
● संपूर्ण भारतीय असलेली रुपे कार्ड सेवादेखील मॉरिशसमध्ये सुरू करण्यात आली आहे.
● या सेवेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि श्रीलंकेचे अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
● या दोन्ही नव्या फिनटेक सेवांचा मॉरिशस आणि श्रीलंका यांना फायदा होईल.
● यूपीआय विविध देशांना जोडत नव्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे.