अकरावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिंडोरी तालुक्यातील मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्म परिसरात 4 आणि 5 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
अधिक माहिती
● संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे असतील; तर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
● या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ‘सह्याद्री फार्म’चे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष विलास शिंदे असणार आहेत.
● कार्याध्यक्ष म्हणून गंगाधर मुटे यांची; तर संयोजक म्हणून न मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश बोरूळकर यांची निवड करण्यात आली आहे.
● संमेलनाच्या आयोजनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
● या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती शास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ, शेती अर्थशास्त्राचे अभ्यासक आदी मान्यवर सहभाग घेणार आहेत.