‘इन्सेंट 3 डीएस’ या हवामानशास्त्रीय उपग्रहाचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाच्या (जीएसएलव्ही एफ 14) साह्याने यशस्वी प्रक्षेपण झाले. ‘इन्सॅट 3 डीएस’च्या साह्याने अद्ययावत हवामानशास्त्रीय सुविधा पुरविण्यात येणार असून, आपत्ती व्यवस्थापनासाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.
अधिक माहिती
● श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून 17 फेब्रुवारी रोजी 5 वाजून 17 मिनिटांनी ‘जीएसएलव्ही’ने यशस्वी उड्डाण केले.
● उड्डाणानंतर 18 मिनिटांनी 2274 किलो वजनाच्या ‘इन्सॅट 3 डीएस’ला पृथ्वीभोवतीच्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) यश आले.
● मुख्य उद्देश: जमीन, समुद्र, हवामान आणि आपत्कालीन सिग्नल यंत्रणा यांची माहिती देणे
● भारताचे ‘इन्सॅट 3 डी’ आणि ‘इन्सेंट 3 डीआर’ हे दोन उपग्रह सध्या कार्यरत असून, त्यांचा कार्यकाळ 2026 पर्यंत संपण्याची अपेक्षा आहे.
‘जीएसएलव्ही एफ 14’
● उंची – 52 फूट
● एकूण टप्पे 3
● सर्वात वरील टप्प्यात क्रायोजिक इंधन
‘इन्सॅट- 3 डीएस’ उपग्रह
● वजन : 2274 किलो
● जमीन आणि सागरी पृष्ठभागाचे निरीक्षण व अभ्यास
● वातावरणाचा अंदाज नैसर्गिक आपत्तीचा पूर्व इशारा देणार