भारतीय महिला बॅडमिंटन संघाने मलेशियामध्ये शाह आलम या ठिकाणी झालेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्या महिलांनी अंतिम फेरीच्या लढतीत थायलंडचे कडवे आव्हान 3 – 2 असे परतवून लावत पहिल्यांदाच ही आशियाई बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला.
अधिक माहिती
● भारताने पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली, हे विशेष.
● पी. व्ही. सिंधू हिचा अनुभव, ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद यांचा दमदार खेळ व युवा अनमोल खरब हिचा धाडसी खेळ, याच जोरावर भारतीय महिला संघाने देदीप्यमान कामगिरी केली.
● याआधी भारताच्या पुरुष संघाने दोन वेळा कांस्यपदक पटकावले होते.
● भारताने आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत तिसरे पदक मिळवले.
● यापूर्वी, भारतीय पुरुष संघाने 2016 आणि 2020 मध्ये बकांस्यपदक मिळवले होते.