भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांची संयुक्त अरब अमिराती संघाच्या मुख्य प्रशिक्षपदासाठी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पाकचे मुदस्सर नझर यांची जागा ते घेतील.
अधिक माहिती
● महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये जिंकलेल्या पहिल्यावहिल्या द्वेन्टी- 20 विश्वकरंडक स्पर्धेत राजपूत हे हंगामी प्रशिक्षक होते.
● अमिरातीमध्ये 28 तारखेपासून विश्वकरंडक लीग-2 ही तिरंगी मालिका होत आहे. ही मालिका राजपूत यांची पहिली जबाबदारी असेल. त्यानंतर अमिरातीचा संघ स्कॉटलंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
● जून महिन्यात होत असलेल्या द्वेन्टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी अमिरातीचा संघ पात्र ठरलेला नाही. या पार्श्वभूमीवर संघाची नव्याने तयारी करण्यासाठी राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.