ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. विविध श्रेणीतील संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली, अभिनेत्री ऋतुजा बागवे, ढोलकी वादक विजय चव्हाण आदी कलाकारांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
अधिक माहिती
● केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाअंतर्गत संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रांत अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिले जातात.
● वर्ष 2022 आणि 2023 साठी सहा साहित्य एक अकादमी फेलो आणि 92 कलाकारांना पादिता अकादमी पुरस्कार जाहीर झाले.
● अकादमीची फेलोशिप हा अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान समजला जातो. तीन लाख रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
● शिवाय, अकादमी पुरस्कार मिळालेल्यांना एक लाख रुपये, ताम्रपत्र आणि शाल प्रदान केली जाणार आहे.
● संगीत नाटक अकादमी ही भारत सरकारने दिल्लीमध्ये स्थापन केलेली एक राष्ट्रीय स्तरावरील संगीत व नाट्य कलेची ॲकॅडमी आहे.
● स्थापना: 1953