लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्यात आली. देशपांडे यांच्या जागी एस. चोक्कलिंगम यांची मुख्य निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा मार्चच्या सुरुवातीला अपेक्षित आहे.
अधिक माहिती
● राज्यातील लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक – मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पार पडते. त्यामुळे या पदाची जबाबदारी सर्वांत महत्त्वाची असते.
● श्रीकांत देशपांडे यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीची तयारी सुरू केली होती.
● आता त्यांच्या जागी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त झालेले एस. चोक्कलिंगम 1996 च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत.