लॉस एंजेलिस येथील ओव्हेशन हॉलिवूड या ठिकाणी डॉल्बी थिएटरमध्ये 96 व्या ऑस्कर चित्रपट पुरस्काराचे वितरण झाले. सर्वाधिक नामांकने आणि बोलबाला असलेल्या ‘ओपेनहायमर’ या चित्रपटाला सर्वोत्तम अभिनयासह सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
अधिक माहिती
• अणुबॉम्बचे जनक मानले जाणाऱ्या जे .रॉबर्ट ओपेनहामर यांच्या जीवनावर आधारित ओपेनहायमरला सर्वाधिक पुरस्कार मिळाले.
• ‘ओपेनहायमर’ला एकूण 7 पुरस्कार मिळाले, तर पुअर थिंग्ज, अमेरिकन फिक्शन, द झोन ऑफ इंट्रेस्ट, द होल्डओव्हर्स, अॅनॉटॉमी ऑफ फॉल्स या सर्वोत्कृष्ट तुल्य सिनेमाच्या इतर दावेदारांमध्ये महत्त्वाचे पुरस्कार विभागले गेले.
• सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार एमा स्टोन या अभिनेत्रीला ‘पुअर थिंग्ज’ या चित्रपटासाठी मिळाला.
महत्वाचे पुरस्कार विजेते
• सर्वोत्कृष्ट चित्रपट – ओपेनहायमर
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ख्रिस्टफर नोलान (ओपेनहायमर)
• सर्वोत्तम अभिनेता – सिलिअन मर्फी (ओपेनहायमर)
• सर्वोत्तम अभिनेत्री – एमा स्टोन (पुअर थिंग्ज)
• सर्वोत्तम सहायक अभिनेता – रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर (ओपेनहायमर)
• सर्वोत्तम सहायक अभिनेत्री – द वाइन जॉय रेण्डॉल्फ (द होल्डोव्हर्स)
• सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट – द झोन ऑफ इंटरेस्ट (ब्रिटन)
• सर्वोत्कृष्ट माहितीपट – 20 डेज इन मारिओपोल
• सर्वोत्तम ऍनिमेटेड चित्रपट – द बॉय अँड द हेरॉन
नितीन देसाई यांना आदरांजली…
• भारताचे दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना ऑस्करच्या सोहळ्यात आदरांजली वाहण्यात आली.
• पुरस्कार वितरणातील ‘इन मेमोरिअम’ या विभागात देसाई यांच्यासह टीना टर्नर, मॅथ्यू पेरी आणि अन्य दिवंगत कलाकारांना आदरांजली वाहण्यात आली.
• देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या स्टुडिओत 2 ऑगस्ट 2023 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
ऑस्कर पुरस्काराची सुरवात : 16 मे 1929