Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

नायब सिंह सैनी हरियानाचे नवे मुख्यमंत्री

नायब सिंह सैनी यांनी हरयाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते हरियाणाचे 11 वे मुख्यमंत्री आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर नायब सिंह सैनी यांची त्यांच्या जागी निवड करण्यात आली. भाजपनं जेजेपी (जननायक जनता पक्ष) पक्षाशी असलेली युती तोडली, यानंतर नायब सिंह सैनी यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोण आहेत सैनी?
• नायब सिंह सैनी हे कुरुक्षेत्रचे खासदार आहेत.
• ओबीसी समाजातून आलेल्या सैनी यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हरियाणा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
• मागील 22 वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत.
• 2002 मध्ये भाजपशी जोडल्या गेलेल्या सैनी यांनी जिल्हा पातळीपासून अनेक पदं भूषवली आहेत.
• 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते.
• 2019 मध्ये लोकसभेतही त्यांनी बाजी मारली.
• कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून ते विद्यमान खासदार आहेत.
• 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.
• ते भाजप हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत.
• 2010 मध्ये, सैनी यांनी नारायणगड मतदारसंघात रामकिशन गुर्जर यांच्यावर 302८ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यानंतर, 2014 मध्ये सैनींना राज्याच्या मंत्रिमंडळात देखील काम करण्याची संधी मिळाली होती.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *