किडनीच्या आरोग्याची जागरुकता पसरविण्यासाठी दर वर्षी 14 मार्च हा दिवस ‘वर्ल्ड किडनी डे’ म्हणून साजरा केला जातो. जागतिक किडनी दिन हा एक जागतिक आरोग्य सेवा कार्यक्रम आहे जो 2006 पासून दरवर्षी मार्चमध्ये 2 ऱ्या गुरुवारी साजरा केला जातो
2024 ची थीम
• जागतिक किडनी दिनाची थीम ‘सर्वांसाठी किडनीचं आरोग्य’
2006 मध्ये पहिल्यांदा जागतिक किडनी दिन साजरा करण्यात आला. दरम्यान त्यावेळी इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी (ISN) आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन (IFKF) यांनी जागतिक किडनी दिन साजरा करण्याची सुरुवात केली होती.
उद्देश
• किडनीशी संबंधित आजार आणि त्यावर योग्य उपचार याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे.