दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन हा ग्राहकांमध्ये त्यांचे हक्क आणि गरजांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
2024 ची थीम
“ग्राहक संबंधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य आणि जबाबदार वापर”
इतिहास
• जागतिक ग्राहक हक्क दिनाची प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनेडी यांच्याकडून घेतली गेली. त्यांनी 15 मार्च 1962 रोजी युएस कॉंगेसला एक विशेष संदेश पाठवला. यामध्ये त्यांनी ग्राहक हक्कांचा मुद्दा ठळकपणे मांडला. असे करणारे ते पहिले जागतिक नेते होते.
• त्यानंतर ग्राहक चळवळीने 1983 मधली तारीख ठरवली. त्यानंतर 15 मार्चपासून ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांच्या महत्वाच्या समस्यांवर योग्य दिशा देऊन त्या सोडविण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला.