मतदार शिक्षण आणि समावेशकता या पैलूंना चालना देण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच एक अभिनव उपक्रम राबवला. आयोगाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सहयोगाने, भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघटना आणि दिल्ली तथा जिल्हा क्रिकेट संघटना यांच्यादरम्यान एका प्रदर्शनीय क्रिकेट सामन्याचे आयोजन केले.
अधिक माहिती
• नवी दिल्लीत कर्नेलसिंग स्टेडियमवर 16 मार्च 2024 या दिवशी हा सामना खेळविण्यात आला.
• अर्जुन पुरस्कार विजेती दिव्यांग तिरंदाज शीतल देवी हिचे नाव यावेळी ‘दिव्यांग श्रेणीतील राष्ट्रीय आदर्श व्यक्तिमत्त्व (नॅशनल आयकॉन)’ म्हणून घोषित करण्यात आले.