दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.
जागतिक जल दिनाचा इतिहास
• शुद्ध पिण्याच्या पाण्याचा होणारा गैरवापर आणि सतत कमी होत चाललेली पाण्याची पातळी याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 22 डिसेंबर 1992 रोजी ठराव संमत केला आणि जागतिक जल दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन जागतिक जल दिन सुरू करण्याचा निर्णय घेतला.
• 22 मार्च 1993 रोजी पहिल्यांदा जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.
2024 मधील जागतिक जल दिन थीम : “शांततेसाठी पाणी”