- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) रणजी संघाच्या गत हंगामातील अपयशानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने निवड समितीपासून आमूलाग्र बदल केले आहेत.
- रणजी निवड समितीचे अध्यक्षपद माजी रणजीपटू अक्षय दरेकरकडे सोपविण्यात आले आहे. एमसीएचे सचिव कमलेश पिसाळ यांनी विविध वयोगटातील निवड समित्यांची घोषणा केली.
- रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी संतोष जेधेच्या जागी मुंबईच्या सुलक्षण कुलकर्णीची निवड करण्यात आली आहे.
- सुलक्षण कुलकर्णी गतहंगामात मध्य प्रदेशचे प्रशिक्षक होते.
- महाराष्ट्राचा माजी कर्णधार मिलिंद गुंजाळकडे 19 वर्षांखालील गटाच्या निवड समितीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर वरिष्ठ महिला संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी स्नेहल जाधवची निवड करण्यात आली आहे.