Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पी. टी. नायर यांचे निधन

  • कोलकात्याचे प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक पी. थंकप्पन नायर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी  निधन झाले.
  • कोलकत्याचे पायी भटकंती (बेअरफुट) करणारे इतिहासकार अशी  त्यांची ओळख होती.
  • या शहरातील प्रत्येक रस्त्याचा आणि परिसराचा इतिहास संशोधन करण्यासाठी ते पायी फिरत असत.
  • नायर हे गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होते.
  • रोजगाराच्या शोधात ते 1955 मध्ये केरळमधील एका छोट्याशा गावाहून कोलकत्यात आले होते. त्यावेळी ते 20 वर्षांचे होते.
  • सुरुवातीला ‘डलहौसी स्क्वेअर’मध्ये त्यांना स्टेनोटायपिस्टची नोकरी मिळाली.
  • भारतीय मानववंशशास्त्रीय सर्वेक्षण विभागातही त्यांनी काम केले.
  • नायर यांनी नंतर कोलकत्याच्या इतिहास 5 संशोधनाचे काम स्वतंत्रपणे करण्यास सुरुवात केली.
  • काही प्रकाशन संपादनही केले.
  • ‘ए हिस्ट्री ऑफ कलकत्ता स्ट्रीट्स” हे पुस्तक नायर यांचे पुस्तक त्यांच्या लोकप्रिय ग्रंथांपैकी एक आहे.
  • अनेक इतिहासकार, वारसा तज्ज्ञ आणि हौशी इतिहास अभ्यासक आणि सरकारी नोकरशहाही या पुस्तकाचा संदर्भ म्हणून वापर करतात.
  • नायर हे कोलकत्यामधील भवानीपुरा भागात एका खोलीत राहत होते.
  • त्यांनी आयुष्यात कधीही मोबाईल फोन व – संगणकाचा वापर केला नाही.
  • पश्चिम बंगालच्या राजधानीच्या इतिहासाच्या विविध पैलूंवर त्यांनी सुमारे 61 पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *