- भारतीय रिझर्व्ह बँकेला यंदाच्या ‘रिस्क मॅनेजर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- लंडनमधील सेंट्रल बँकिंग प्रकाशन संस्थेद्वारे हा पुरस्कार दिला जातो.
- जोखीम संस्कृती आणि जागरूकता सुधारण्याबाबत केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हा रिझर्व्ह बँकेला जोखीम व्यवस्थापकाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
- लंडनमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात रिझर्व्ह बँकेच्या वतीने कार्यकारी संचालक मनोरंजन मिश्रा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.