- राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा 2024 चा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जाहीर झाला आहे.
- या पुरस्काराचे वितरण येत्या 26 जून रोजी शाहू जयंतीदिनी करण्यात येणार आहे.
- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या पुरस्काराची शनिवारी घोषणा केली.
- समाजप्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, क्रीडा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस 1984 पासून हा पुरस्कार देऊन न सन्मानित करण्यात येते.
- आतापर्यंत एकूण 37 पुरस्कार देण्यात आले आहेत.
- एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
- सुराणा यांचे जीवन पीडित व शोषित वर्गांना न्याय देण्यासाठी समर्पित झाले आहे.
- महागाईविरोध, दुष्काळ निवारण व शेतकऱ्यांना जमीन हक्क मिळवून देणे, नामांतर व आणीबाणी विरोधी चळवळीत त्यांनी भाग घेतला.
- सात वेळा त्यांनी तुरुंगवास भोगला.
- सुराणा – यांनी एस. टी. महामंडळाच्या कर्मचारी – यांच्या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले आणि त्यांच्या हक्कासाठी अनेक लढे – लढवले.
- राष्ट्रसेवा दल संघटनेचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते.
- ते ‘मराठवाडा’ या दैनिकाचे अनेक वर्षे संपादक होते.
- सुराणा यांनी 69 पुस्तके आणि पुस्तिका लिहिल्या.
- सुराणा यांनी लातूर येथील भूकंपामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी ‘आपले घर’ हे वसतिगृह चालवून त्यांना आधार दिला.
- परांडा तालुक्यात पाणलोट क्षेत्र विकासाचे व शेती विकासाचे कार्यक्रम ते राबवित आहेत.